
भिसी पानी पुरवठा योजनेला तांत्रीक मंजुरी प्रदान
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भिसी:-चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्ती कुमार भांगडीया यांच्या विकास कामाचा डंका पंचक्रोशीत वाजत असतो. जनतेला दिलेला शब्द पाळने त्यांची सवयचं झाली आहे. असाच एक शब्द त्यांनी भिसीवासीयांना दिला होता तो म्हणजे सातही दिवस चोवीस तास पानी पुरवठा करण्याचा आनी तो शब्द त्यांनी ६५, १६, २६.९८२/- (रुपये पासष्ट कोटी सोळा लक्ष सव्वीस हजार नौशे ब्यांशी फक्त) च्या पानी पुरवठा योजनेला तांत्रीक मंजुरी मिळवून देऊन पूर्ण केला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत भिसी पाणी पुरवठा योजना ता. चिमूर जिल्हा चंद्रपूर चा प्रकल्प अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग, नागपूर या कार्यालयास तांत्रिक मंजुरी करिता सादर करण्यात आला होता.सदर योजनेच्या रु. ६५, १६, २६.९८२/- (१८% GST सह) (रुपये पासष्ट कोटी सोळा लक्ष सव्वीस हजार नौशे व्यांशी फक्त) किंमतीच्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग, नागपूर व्दारे फेब्रुवारी २०२३ अन्वये तांत्रिक मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. सदर योजनेच्या तांत्रिक मंजुरी पोटी भरावयाचे १ टक्के तांत्रिक शुल्क म्हणजेच रु. ५५.२२ लक्ष नगर पंचायतला भरावयाचे आहे. भिसी नगर पंचायतचे पत्र क्र. ३५७, दि. २१/७/२०२२ अन्वये रु. १०.०० लक्ष शुल्क मजीप्रास प्राप्त झाले.
असुन उर्वरित रु. ४५.२२ लक्ष तांत्रिक शुल्क एका वर्षात दहा हप्त्यात भरणे बाबत मुख्याधिकारी नगर पंचायत भिसी यांनी हमीपत्र दिलेले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग व्दारे मंजूर या पानी पुरवठा योजनेला गोसेखुर्द धरणाच्या मोखाबर्डी उपसा सिंचन प्रकल्पाद्वारे पानी पुरवठा होणार असुन भिसीवासीयांना दररोज प्रतीव्यक्ती 135 लिटर पानी उपलब्ध होणार आहे.आमदार किर्ती कुमार भांगडीया यांनी भिसी वासीयांचा रखडलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे भिसीवासीयांनी आभार मानले.