
फुले-आंबेडकर संयुक्त जंयती महोत्सवाला उपस्थिती
चंद्रपूर जिल्हा ओबीसी,अनु.जाती विभागाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चंद्रपूर जिल्हा (ग्रामिण)काँग्रेस कमिटी ओबीसी/अनु.जाती विभाग तथा चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेस युवा नेते तथा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस (ओ.बी.सी. विभाग) दिवाकर निकुरे यांचे विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा फुले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.नेहरू विद्यालयाच्या पटांगणात १३ एप्रिल रोज गुरुवारला सांयकाळी ५.०० वाजता होणाऱ्या या जंयती उत्सवात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले तथा भारतिय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या संयुक्त जंयती कार्यक्रम महोत्सवा निमीत्त बहुजनांचा संघर्ष आणी दिशा या विषयावर मार्गदर्शन तथा संगीत प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, सहउद्घाटक खासदार बाळु धानोरकर,कार्यक्रमाध्यक्ष माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार,स्वागताध्यक्ष जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) दिवाकर निकुरे,विशेष अतिथी आमदार सुभाष धोटे,आमदार प्रतिभाताई धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (अनु.जाती विभाग) प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबोरे,जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा (ग्रामिण)काँग्रेस कमिटी प्रकाशभाऊ देवतळे,माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश (ओबीसी विभाग) सरचिटणिस देवानंद पवार, उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) जेसाभाई मोटवानी,माजी जिल्हा परीषद अध्यक्ष डॉ.सतिशभाऊ वारजुरकर,राष्ट्रीय समन्वयक,ओबीसी विभाग गोविंद भेंडारकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटणिस गजानन बुटके,महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, अनु.जाती विभाग जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे,चिमूर तालुकाध्यक्ष विजय गावंडे उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच चिमूर तालुका प्रेस असोसिएशन अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,ओबीसी विभाग प्रदेश संघटक धनराज मुंगले,माजी जिल्हा परीषद सदस्य
खोजराम मरस्कोल्हे,माजी नगरसेवक उमेश हिंगे,अल्पसंख्य विभाग माजी तालुकाध्यक्ष जाहिदभाई शेख,युवक काँग्रेस महासचिव गौतम पाटील,ई-रिक्षा असोसिएशन,चिमूर अध्यक्ष सुरेश मेश्राम,सामाजिक कार्यकर्ता,नागभिड नितीन कटारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.मार्गदर्शन कार्यक्रमानंतर महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकगित गायक,अभिनेते,नाटककार अनिरुद्ध वनकर तथा प्रसिद्ध गायीका आणी येऊ कशी येऊ कशी कशी मी नांदायला फेम कोमल धांडे यांचा बुद्ध,शिवाजी महाराज फुले,शाहु,आंबेडकर यांचे विचारावर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील नागरीकानी घ्यावा असे आवाहन आयोजक दिवाकर निकुरे तथा चंद्रपूर जिल्हा (ग्रामिण)काँग्रेस कमिटी ओबीसी/अनु.जाती विभाग यांनी चिमूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके. सुधीर पोहिंनकर. जावा शेख. गौतम पाटील उपस्थित होते.