
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत माहेर, खरबी, तुमडीमेंढा ही गावे यापूर्वी खेडमक्ता साज्यात होती. ब्रम्हपुरी तहसिलदार यांच्या साझा पुनर्रचना आदेशाने मौजा माहेर, खरबी, तुमडीमेंढा या गावांचा खेडमक्ता साज्यातून नाव कमी करून देलनवाडी साज्यात समावेश करण्यात आला. गावातील काही नागरिकांच्या शेतजमिनी खेडमक्ता साज्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळया ठिकाणांहून सातबारा काढणे हे शारीरिक व मानसिक त्रासाचे होणार आहे.
त्यामुळे माहेर, खरबी, तुमडीमेंढा ही गावे पूर्वीच्या खेडमक्ता तलाठी साज्यात समाविष्ट करण्यात यावे. यामुळे गावकऱ्यांना होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. खेडमक्ता साज्यात वरील तिन्ही गावे समाविष्ट न झाल्यास शिवसेना व गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार असल्याचा इशारा प्रस्तुत निवेदनातून देण्यात आला. तालुक्यातील ग्रामपंचायत माहेर, खरबी, तुमडीमेंढा या गावांना देलनवाडी साज्यातून वगळून पुनःश्च खेडमक्ता साज्यामध्ये समाविष्ट करयात यावे, या मागणीचे निवेदन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रा.अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्ववाखाली मान. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद भनारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र, केवळराम पारधी, शिवसेना उपतालुकाप्रमुख, ब्रम्हपुरी तथा सरपंच सोंदरी, श्यामराव भानारकर, माजी शहरप्रमुख, ब्रम्हपुरी, मोरेश्वर अलोने, विभागप्रमुख, अहेरनवरगांव, नान्होरी जि.प. क्षेत्र, गुलाब बागडे, विभागप्रमुख, खेडमक्ता-चौगान जि.प. क्षेत्र, गणेश बागडे शाखा प्रमुख, ललीता कामडी. सहर.सनगटीका कुंदा कमाने. तालुका.सनगटीका माहेर, खरबी,बंनडु मेश्राम नारायण अमृतकर गणेश बागडे देवदास बोरघरे तुमडीमेंढा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.