Breaking News

कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूकित शेतकरी सहकारी विकास आघाडीचे एक हाती वर्चस्व

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर ची निवडणूक दि २८ एप्रिल ला होऊन दि २९ एप्रिल ला होऊन आमदार बंटी भांगडिया व संजय डोंगरे यांच्या शेतकरी सहकारी विकास आघाडी पॅनल चे १६ उमेदवार मताधिक्काने व १ उमेदवार अविरोध निवडून १७ उमेदवार विजयी झाले असल्याने एक हाती सत्ता शेतकरी सहकारी विकास आघाडी ची सत्ता आली, शेतकरी सहकारी विकास आघाडी च्या विजयी उमेदवारात सेवा सहकारी संस्था गटातून प्रकाश पोहणकर (३०६ मते ), घनश्याम डुकरे (३१४), नंदू गावंडे (३४२), दशरथ ननावरे (३४२) ,कैलास धनोरे (३२२), रवींद्र पंधरे (३०६), प्रशांत गुरपुडे ३३४), महिला गटातून रेखाताई मालोदे (३५४) , गीता कारमेंगे (३८१),विमुक्त भटक्या गटातून प्रशांत चिडे (३२९), ग्राम पंचायत गटातून मंगेश धाडसे (४१६), संदीप पिसे (३९३),दिनकर शिनगारे (३५०), भास्कर सावसाकडे (३९६),अडते व व्यापारी गटातून मनोहर पिसे (६९), अनिल वनमाळी( ६६),सेवा सहकारी मागासवर्गीय गटातून अविरोध राजू बानकर विजयी झाले .

विजयी उमेदवार यांची विजयी मिरवणूक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय पासून ढोल ताशा च्या वाद्य गजरात घोषणा देत श्रीहरी बालाजी मंदिरात येऊन श्री चे दर्शन घेऊन समारोप भांगडिया जुना वाडा येथे आमदार बंटी भांगडिया , सहकार नेते संजय डोंगरे यांचे मार्गदर्शन झाल्यावर समारोप करण्यात आले.या मिरवणूक मध्ये भाजप, भाजयूमो, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संकटात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले चंद्रपूरचे प्रकल्प कार्यालय

एक लक्ष रुपयांची तात्काळ मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे बकऱ्या …

जिल्हा परिषदेच्या 24 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत एकूण 24 जिल्हा परिषद शाळांत सेमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved