
पहिल्यांदाच मिळाले ग्राम पंचायत गटाला प्रतिनिधित्व
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-कृषी उत्तपन बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच आटोपल्या..बाजार समिती निवडणुकीत ग्राम पंचायत गठातून जिल्ह्यात सर्वाधिक मताने निवडून आलेले मंगेश धाडसे यांची आज झालेल्या सभापती. उपसभापती पदाच्या निवडणुकीत बहुमताने सभापती पदी निवड झाली तसेच उपसभापती पदी रवींद्र पिसे यांची निवड झाली.
चिमूर बाजार समिती मधे मागील अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात निवडून येणाऱ्या सदस्यांनाच सभापती. उपसभापती ही पदे दिली जात होती. त्यामुळे ग्राम पंचायत गठातून निवडून येणाऱ्या सदस्याला मात्र नामधारी सदस्य म्हणून राहावं लागतं.
परंतु या वर्षी झालेल्या निवडणुकीत ग्राम पंचायत गठातून मंगेश धाडसे हे नावलौकीक असलेले व जन माणसात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्त्व असून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सर्वाधिक मते घेऊन विजय संपादन केल्यामुळे जन समण्यन शेतकऱ्यांमध्ये मंगेश धाडसे सभापती व्हावे ही चर्चा होती. आणि आज बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत बहुमताने खांबाला ग्राम पंचायत उपसरपंच मंगेश धाडसे यांची सभापती पदी निवड करण्यात आली. तर उपसभापती महनुन रवींद्र पंधरे यांची निवड झाली. नवनिर्वाचित सभापती कडून या पंचवार्षिक योजनेत शेतकऱ्यांना न्याय मिळेल अश्या शुभेच्यानचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला. यावेळी सभापती मंगेश धाडसे यांनी निवडणुकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पने मदत करणाऱ्या मतदारांचे आभार व्यक्त केले.