
अग्निशामक तातडीने पोहचल्याने मोठा अनर्थ टळला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर शहरातील उमा नदीच्या काठावर असलेल्या एका हॉटेलला आग लागल्याने अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. अग्निशामक गाडी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाल्याने मोठी हानी ठळली.
आज दिनांक 28 मे रोजी मासळ रोड वरील हिंगे पेट्रोल पंपला लागून असलेल्या हिंगे हॉटेलला शाट सर्किट मुळे अचानक आग लागली व आगीने खूप मोठा भडका घेतल्याने हॉटेल मधील 1 फ्रिझर. 1 फ्रिज. रोख रक्कम. व दुकानातील साहित्य असे अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती फोन द्वारे शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते याना मिळताच त्यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांना माहिती दिली चिमूर नगरपरिषद ची अग्निशामक टीम ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली व आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. अन्यथा बाजूला लागूनच पेट्रोल पंप असल्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती.