तालुक्यातील जनता त्रस्त, तज्ञ असून उपचार नाही
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे.तेही १०० बेडचे या रुग्णालयात सोई सुविधा म्हणजे एक सर्जन डॉक्टर , एक स्त्री रोग तज्ञ , एक चर्मरोग तज्ञ आणि तीन एम.बी.बी.एस. डॉक्टर असे एकूण ६ डॉक्टर आहे.व दोन कंत्राटी डॉक्टर आहेत एक आयुर्वेदिक तर एक होमिओपॅथी आहे. तसेच एक दंत तज्ञ सुद्धा आहे परंतु ते २ महिन्याच्या वर झाले रुग्णालयातुन बेपत्ता आहेत त्यांना सोकाश पत्र दिले आहे.५ कंत्राटी सफाई कामगार आहेत.त्याचे मासिक वेतन हे वेळेवर न होता ५ महिने उलटूनही त्यांना वेतन दिल्या जात नाहीत म्हणून त्यांचे कामावर दुर्लक्ष दिसून येत आहे.
या उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकिय अधिक्षक डॉ.आनंद किंन्नाके यांचे हेतुपरस्पर दुर्लक्ष असल्याचे रुग्णांनी सांगितलेल्या मुलाखती वरून कळते.रुग्णालयाची चौफेर चौकशी केली तर शौचालय व बाथरूम ची अवस्था अतिशय बिकट बघावे तिकडे घाणीचे साम्राज्य आढळून आले. दुर्गंधी मुळे रुग्णांचे आरोग्य सुधारण्या ऎवजी आरोग्यात बिघाड होत चालले आहे.आंतर रुग्ण म्हटले तर एका – एका रुग्णाची प्रकृती सुधारण्यासाठी रुग्णांना दिवस मोजावे लागत आहे. या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात, मात्र पाहिजे त्या सुविधा त्यांना मिळत नसल्याने रुग्णांना त्रास होत आहे. नाईलाजाने गरीबांना रुग्णालयात यावे लागते, शासनाने रुग्णांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, डॉक्टरांची संख्या कमी आहे ती संख्या वाढविली पाहिजे व स्वच्छतेकडे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे,रुग्णालयातील काही वॉर्डातील शौचालयामध्ये अस्वच्छता आहे.
या शौचालयाच्या दुर्गधीमुळे रुग्णांसह त्यांच्या नागरीकांना त्रास होतो.दरम्यान, काही खिडक्यांवर खर्रा खाऊन पिचकाऱ्याही मारल्या आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध आहेत मात्र काही विभागात आवश्यक ती सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सर्वसामान्य रुग्णाची प्रकृती थोडक्यात बरी नसल्याचे दिसून येताच डॉक्टर हात वर करून रुणांना चंद्रपूर रेफर दिल्या जाते.चिमूर वरून चंद्रपूर व नागपूर हे अंतर १०० किमी अंतरावर आहे. महामार्गाची अवस्था अतिशय खराब असल्याने वाटेतच रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.अशी अवस्था असतांना रुग्ण कल्याण समिती , कार्यकारी मंडळ ,तसेच नियामक मंडळ समितीतील सदस्य यांचेही याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. स्थानिक आमदार यांचेही याकडे दुर्लक्ष असून याकडे लक्ष देणार तरी कोण असा रुग्णांना प्रश्न उपस्थित झाला आहे.