Breaking News

शंकरपूर कांपा रस्त्यावर लावले बेशरम चे झाड़ गावातील युवकाचा पुढाकार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/शंकरपूर:-कांपा चिमूर हा राज्य महामार्ग आहे या रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघाताला आमंत्रण देत आहे बांधकाम विभागाकडून हे खड्डे बुजविन्यात आले नसल्याने त्या खड्यामध्ये बेशरम चे झाडे लावून येथील युवकांनी बांधकाम विभागाचा निषेध केला आहे, चिमूर कांपा हा राज्य महामार्गवर 15 गावे बसले आहे तर रस्त्याच्या परिसरात 30 गावे आहेत तर 33 किलोमीटर चे अंतर आहे या सर्व गावातील नागरिकांना या रस्त्याचा वापर करावा लागतो परंतु या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत शंकरपूर ते कांपा या आठ किलोमीटर च्या अंतरावर तर जीवघेणे खड्डे आहेत या रस्त्यावरून दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे.

या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम व गिट्टी टाकून दोनवेळा बुजविले परंतु खड्डे आहे तसेच आहे त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खड्डे बुजविण्यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे त्यामुळे हा रस्ता होणार की नाही असाप्रश्न निर्माण झाला असून सध्यातरी या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात यावे यासाठी येथील युवकांनी बेशरम चे झाडे लावून लक्ष वेधले आहे हे बेशरम चे झाडे आमोद गौरकर अशोक चौधरी आशिष चौधरी निखील गायकवाड आशु हजारे गणेश वानकार साधू गेडाम विनोद घरत अमन मेश्राम प्रियंशु वाढई नंदू शेरकी मनोज सहारे रुपेश रंदये बबलू शेख आदिंनी लावले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved