
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद शाळा येथे दि 2 आक्टोबला महात्मा गांधी यांची 153 वी लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती साजरी करण्यात आली प्रथम प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शाळेतील विद्यार्थी यांनी आपले भाषण सादर केले महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा,प्रेम, या मार्गावर जनतेला चालण्याचा संदेश दिला असे मुलांनी आपल्या भाषणात सांगितले,या दोन महात्माचे जयंती एकाच दिवशी येत आहे हा फार मोठा क्षण या दोन्ही महामानवाचे कार्य भारतासाठी फार मोलाचे आहे,असे शाळेच्या मुख्यध्यापीका रत्नमाला धुर्वे यांनी मुलांना समजून सागितले,यावेळी सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हजर होते व शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रत्नमाला धुर्वे, साहायक शिक्षक सदिप टुले, चौधरी मॅडम, केदार मॅडम, पेटकर मॅडम हे सर्व हजर होते.