
भारत मुक्ती मोर्चा, व छत्रपती क्रांती सेना वडकी यांच्याकडून एकदिवस महाराष्ट्र बंद
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:-सोमवार 02 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ११.०० वाजता मोठा बोगदा, राळेगांव रोड, वडकी येथे महाराष्ट्र बंद अंतर्गत भारत मुक्ती मोर्चा व छत्रपती क्रांती सेना वडकी यांच्या वतीने धरणा प्रदर्शन करण्यात आले.. मराठा आरक्षण च्या उपोषणाला गृहमंत्री फडणवीसाच्या आदेशावरुन मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या विरोधात, महाराष्ट्र राज्याच्या ६२ हजार सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याच्या संविधानाविरोधी व बहुजनविरोधी आरएसएस / भाजपा सरकारच्या धोरणाच्या विरोधात, शिव – फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र वेठ बिगारांचा महाराष्ट्र करण्याच्या आरएसएस /भाजपा सरकारच्या धोरणाच्या विरोधात , ओबीसींची जातीनिहाय जनगणना व संविधानिक हक्क अधिकाराच्या समर्थनात, बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपुरचे पांडुरंगाचे मंदिर बडवे ब्राम्हणांच्या स्वाधिन करण्याच्या आरएसएस / भाजपाच्या षड्यंत्राच्या विरोधात तसेच बहुजन महापुरुषांचा, संविधान व राष्ट्र प्रतिकांच्या अपमान करणाऱ्या देशद्रोही, आतंकवादी, दंगलखोर मनोहर भिडेला अभय देणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधामद्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धरणा प्रदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी रनजीत आडे तालुका अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच यशवंत वैद्य छत्रपती क्रांती सेना वडकी सर्कल अध्यक्ष, निलेश मून मीडिया प्रभारी, संजय इंगोले पाटील बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा उपाध्यक्ष, मेघराजजी निमसटकर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल प्रभारी, इंजिनीयर प्रशांत मुनेश्वर, राज्य प्रभारी भारतीय बेरोजगार मोर्चा यांनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी ज्योत्स्ना आनंद पन्नासे, सरपंच ग्रामपंचायत परसोडा, शैलेश बेलेकर सरपंच, ग्रामपंचायत वडकी, करुणा मेंढे, शीला जंगलीवार प्रामुख्याने उपस्थित होते… या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोरडे जिल्हाध्यक्ष मौर्य क्रांती संघ यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक वानखडे यांनी केले… हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हबीब पठाण, अरुण फुटाणे, निलेश ठमके वैभव ठमके कपिल रामटेके आनंद पन्नासे सुरेंद्र मेंढे संजय नरांजे, राहुल नरांजे, परवेज पठाण शाकीरखा पठाण, गणेश धानोरकर, लाला मरसकोल्हे, विकास येलके यांनी अथक परिश्रम घेतले.