Breaking News

भाजपचे सतीश जाधव यांना अपघात प्रकरणी १२ तासाच्या आत अटक करा

चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे पोलीस निरीक्षकांना व तहसीलदार यांना दिले निवेदन

चिमूर तालुक्यातील समस्त रेती व मुरूम  माफियांवर कारवाई करण्यात यावी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दिनांक.०५/०२/२०२४ माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे नेते विनोद ढाकुणकर यांच्या अपघात प्रकरणी आरोपी सतिश जाधव यांना अटक करून त्यांची ईनोव्हा गाडी जप्त करून कारवाई करण्यात यावी.याकरिता चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे पोलीस निरीक्षकांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.दिनांक.०४/०२/२०२४ ला अंदाजे दुपारी ०२:३० वा चे सुमारास राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील पिंपळनेरी चिमुर मार्गावर भाजपचे नेते तथा माजी नगरसेवक नगर परिषद चिमूर सतिश जाधव यांच्या ईनोव्हा वाहन क्रमांक. एम एच ३४ बी आर ०१०१ या गाडीने दुचाकी क्रमांक.एम एच ३४ बी डी ३१२८ या वाहनाला मागून जोरदार धडक दिली त्यामध्ये विनोद ढाकुणकर यांच्या डोक्याला जबर मार लागुन ते बेशुध्द पडल्यामुळे त्यांना डॉ. दिलीप शिवरकर यांचे रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रुग्ण गंभीर जखमी असल्याने नागपुर येथील न्युरॉन हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेमुळे विनोद ढाकुणकर यांचा परिवार तथा काँग्रेस परिवार, तसेच चिमुर शहरातील जनतेमध्ये तर्क – वितर्क तसेच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक सतिश जाधव हे आमदार बंटी भांगडीया यांचे निकटवर्तीय आहे. आमदार भांगडीया हे काँग्रेस कार्यकर्त्यांना विविध मार्गाने प्रलोभन दाखवुन भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकीत असतात. जर त्यामध्ये यश आले नाही तर वेगळया पद्धतीने धमकवितात त्यातलाच तर हा अपघात नसुन घातपात असावा अशी शंका त्यांच्या परिवारात, जनमानसात, व काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली असुन पुढचा घात कोणत्या काँग्रेस कार्यकर्त्याचा होईल या बाबत भिती निर्माण झाली आहे. सतिश जाधव यांचे विविध व्यवसाय (अवैध) आहे. काही दिवसापुर्वी अवैध उत्खनन करीत असतांना त्यांचा जे सी बी वनविभागाने जप्त केला.

परंतु मोठा अपघात होऊन सुध्दा त्यांची ईनोव्हा गाडी जप्त करण्यात आली नाही. अपघाताचे वेळी स्वतः ईनोव्हा गाडी सतिश जाधव चालवीत होते. अपघात करूनही मगरुरीने दिवसभर सतिश जाधव हे आमदार बंटी भांगडीया सोबत विविध कार्यक्रमामध्ये उपस्थित होते अशी चर्चा आहे. अपघातानंतर जाधव यांनी एक जबाबदार नागरिक म्हणुन पोलीस स्टेशनला ईनोव्हा गाडी जमा करायला पाहिजे होती. परंतु तसे न करता गाडी गायब करुन मनमोकळे आणि बिनधास्तपणे फिरत आहेत.या सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेद करीत आहोत. याची सखोल चौकशी करुन त्याची इनोव्हा गाडी जप्त करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी या निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली.यावेळी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved