Breaking News

खांबाडी (बोरगाव) येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- पवनी तालुक्यातील पिंपळगाव (नि.) केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबाडी येथे दिनांक ६ व ७ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबाडी येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या हेतूने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले आहे.स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई हजारे व सह उद्घाटक पंचायत समिती सदस्य प्रमोद मेंढे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिवसेना ता.अध्यक्ष राजूभाऊ ब्राम्हणकर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. शीतल ब्राह्मणकर, उपसरपंच सौ. अंतकला रामटेके, पिंपळगाव केंद्र प्रमुख विनायक पडोळे, ग्रामसेवक आरीकर, सुरेश खोब्रागडे, हरिदास घावळे, पोलीस पाटील विजय ब्राम्हणकर, जितेंद्र खोब्रागडे, बोरगाव येथील मुख्याध्यापिका भोयर मॅडम, अंगणवाडी सेविका अल्काताई गजभिये, ग्राम पंचायत सदस्य दीपक चव्हाण, रंजित गजभिये, सौ.सुषमा लोणारे, सौ.नमिता सुखदेवे, गणेश कावळे, संगणक परिचालक सुभाष चव्हाण, अरुण कावळे, सौ. शकुंतला सुखदेवे, सौ. सुदर्शना खोब्रागडे, सौ. इंदूताई रहेले, सौ. मिनाक्षी ब्राम्हणकर, गणपत राठोड, देवकुमार झलके, रतन सुखदेवे, जगदिश कामथे, सुप्रिया आडिकणे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावे असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेंद्र वासनिक, मुख्याध्यापक आर. ए. मेश्राम, सांस्कृतिक प्रमुख सौ. एम. पी. मानकर व माता पालक संघ, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले

भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक …

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved