Breaking News

कॉग्रेसचे माजी नगरसेवक अपघातात गंभीर जख्मी

भाजपचे माजी नगरसेवक यांच्या इनोव्हा कारने दुचाकीला जब्बर धडक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक.०४/०२/२०२४ ला काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास विनोद ढाकुनकर यांनी उपस्थिती दर्शवून दुपारी ०३:०० वाजताच्या सुमारास ग्रामगीता कॉलेज येथे प्रवेश गेटचे बांधकाम बघण्यासाठी गेले असता परत येतांना कॉलेज च्या अगदी समोरील चिमूर उमरेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर TVS कंपनीची जुपिटर दुचाकी क्रमांक.MH 34 BD 3128 तसेच टोयोटा कंपनीची इनोव्हा कार ने दुचाकीला मागून जबर धडक मारल्याने दुचाकी वाहन चालक गंभीर जखमी झाले.

तसेच तात्काळ चिमूर येथील डॉ.दिलीप शिवरकर यांच्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ प्रथमदर्शी उपचार सुरू केले व डोक्याला जबर मार असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. तसेच इनोव्हा कार वाहन चालक गोलू उर्फ सतीश जाधव हे माजी नगरसेवक तथा सभापती व भाजप चे कार्यकर्ते आहेत. या घटनेमुळे भाजप तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा रंगली असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved