विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका तील एका कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या काही वर्षापासून ‘येडेश्वरी निधी अर्बन लिमिटेड या नावाची संस्था लोकांच्या ठेवी स्वीकारून मुदत ठेवीवर द.सा.द.शे. बारा ते तेरा टक्के व्याज देत असे या बँकेमध्ये सौ. वत्सला मधुकर लबडे वय 70 रा. खरडगांव या महिलेने यांनी येडेश्वरी निधी अर्बन लिमिटेड मध्ये सहा महिन्यासाठी 5 जून 2023 रोजी म्हातारपणाची काठी म्हणून साठवून ठेवलेले तीन लाख 60 हजार रुपयांची मुदत ठेव पावती केली होती संबंधित पावतीची मुदत डिसेंबर 2023 मध्ये संपली गेल्या सहा महिन्यांमध्ये संबंधित पावतीची मुद्दल आणि होणारे व्यास याची वारंवार मागणी येडेश्वरी निधी अरमान लिमिटेड चे संचालक आकाश थोरात राहणार खानापूर हल्ली मुक्काम शेवगाव यांच्याकडे वारंवार केली असता “देना आया तो रोना आया”या उक्ती प्रमाणे घरातील पत्नी आणि आई आदी घरातील महिलांना पुढे घालून शिवीगाळ करणे धमक्या देणे तुमचे पैसे मी देणार नाही तुम्हाला माझ काय वाकडे करायचे ते करा अशी उद्धट भाषा वापरणे उद्योग सुरू होते काल दिनांक 15 मे 2024 रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये संबंधित ठेवीदार महिला तिची मुलगी आणि नातेवाईक पैशांची मागणी कारन्या साठी गेले असता हमरी तुमरी वर येऊन तुमचे पैसे मी देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशी उद्धट भाषा वापरली व त्यानंतर संबंधित महिलेने मला आजारपणासाठी पैशांची गरज आहे तुम्ही माझी रक्कम द्या अशी मागणी केली असता घरातील महिला आणि गावातील गुंड मित्र बोलाऊन संबंधित महिलेचा पती मुलगा व जावई संस्थेच्या कार्यालयात कार्यालया समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये तमाशा केला बघ्यांची तोबा गर्दी जमली ठेवीदार महिलेच्या मुलीने संचालकाच्या श्रीमुखात भडकवली हा सर्व तमाशा भर दिवसा दुपारी एक ते दोनच्या दरम्यान चौकात ट्रॅफिक सुद्धा जाम झाली होती* काल रात्री उशिरा शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये आशिष थोरात आणि त्याचे तीन-चार अनोळखी गुंड सहकारी व दोन महिलांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शेवगांव पोलीस करत आहेत दरम्यानच्या झटापटीमध्ये आरोपीच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याने तो उपचारा साठी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल झाला आहे.
*ताजा कलम*
शेवगाव शहरात आणि तालुक्यात अनेक निधी अर्बन लिमिटेड सहकारी संस्था शेअर मार्केटची कार्यालय शेअर मार्केटचे बिगा बुल हजारो ग्राहकांना कोट्यावधींचा चुना लावून परागांधा झाले आहेत त्यामुळे ग्राहक गावातील झाले आहेत माझी आठवड्यातही मातृ तीर्थ निधी अर्बन लिमिटेड च्या दोन संचालकांना ठेवीदारांनी य स्टेट बँक ऑफ इंडिया च्या परिसरामध्ये चोप दिला होता
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*