Breaking News

निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर 13 – लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अंमलात आली आहे. या पार्श्वभुमीवर निवडणूक काळात रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तु जप्त करणे किंवा सोडणे यासाठी मानद कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.

या प्रक्रियेदरम्यान पोलिस विभागाकडे एफ. आय. आर. किंवा तक्रार दाखल न करता कोषागारामध्ये रक्कम किंवा इतर मौल्यवान वस्तु ठेवल्याप्रकरणी संबंधित व्यक्तिंना होणारा त्रास कमी करणे, प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे, अशा प्रकारची कार्यवाही करतांना मानद कार्यपध्दतीचा काटेकोर अवलंब करणे, अन्य बाबींची छाननी / पडताळणी करणे इत्यादी कामांसाठी जिल्हास्तरावर जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे.

सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असून जिल्हा कोषागार अधिकारी हे सदस्य आहेत. तर निवडणूक खर्च परिक्षण व व्यवस्थापन पथकाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम सोडणे / सुपूर्द करणे बाबत निवडणूक खर्च परिक्षण व व्यवस्थापन पथकाचे नोडल अधिकारी यांनी निर्देशांचे तंतोतंत पालन करून अभिलेखाचे जतन करावे. समितीमध्ये असलेले अधिकारी व कर्मचारी हे संपूर्ण निवडणूक काळामध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 13 सी.सी. व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 28 ए अन्वये भारत निवडणूक आयोगाच्या नियंत्रण, अधिक्षण व शिस्त यांच्या अधीन असतील, याबाबत गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आदेशात नमुद आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई …

दिव्यांगना त्वरित धनादेश देण्यात यावा मागणी काँग्रेसचे पप्पुभाई शेख यांनी केली

चिमूर नगर परिषदचे दिव्यांगनाकडे दुर्लक्ष – पप्पुभाई शेख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नगर परिषद अंतर्गत सामान्य फंडातुन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved