Breaking News

अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्यांना दणका

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात गोंडसावरी येथील गावालगत असलेल्या नदीच्या पात्रातुन रेतीचा उपसा करणाऱ्या तिनही हायवा, पोकलेन मशीन व एक बोलेरो चारचाकी वाहनाला काल रात्री ३:०० वाजताच्या सुमारास पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः तिन किलोमीटरचे अंतर पायदळ चालून पायपीट करून मोठी कारवाई केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिली कारवाई स्वतः केल्याने आता थेट त्यांचे चक्र अवैध धंदा चालल्याने पोलीस खात्यात आणि रेती माफियात खळबळ माजली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साध्या ड्रेसमध्ये वेशांतर करून पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी खाजगी वाहणाने मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंडसावरी येथील अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या सहा आरोपीना घटनास्थळी पकडले.

पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस यंत्रणेला या आधीच कारवाई संदर्भात सूचना दिल्या होत्या, मात्र अपवाद असलेल्या पोलीस यंत्रणेला ते आता स्वतःच हाताळणारा असल्याचे या धडाकेबाज कारवाई ने इशारा दिला आहे? अवैध व्यवसायांना पाठबळ देणाऱ्यांना हा सावधान तेचा इशारा समजावे लागेल? पुढील कारवाई मुल पोलीस स्टेशन करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, …

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved