Breaking News

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले. या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे.

सन 2019 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावा, लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबविले. तरुण मतदारांमध्ये रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् बाबत असलेली प्रचंड उत्सुकता पाहता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी ‘माय व्होट इज माय फ्युचर, पॉवर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करणे, तसेच ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या थीमवर आधारीत मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करून फोटो अपलोड करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात नियोजन भवन येथे पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लकी ड्रा काढतांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते.

हे आहेत स्पर्धेतील विजेते मतदार : मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करणे

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र देवराव पोहाणे, रा. तुकुम चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत मधुकर गेडाम, रा. मूल यांना तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक ऋषी बारसागडे, रा. चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.रिल्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडे, रा. टिळक वॉर्ड, बालाजी मंदीरजवळ, चिमूर यांना, द्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकर, रा. पालगाव, पो. आवाळपूर, ता. कोरपना यांना, तृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमील ज्ञानेश्वर मडावी, रा. वॉटर सप्लाय कॉर्टर, गोपालनगर, तुकुम, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

पोस्टर्स स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश यशवंत निकोडे, रा. नेहरू नगर, नवीन वस्ती, डीआरसी रोड, चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल राजू धोगडे, रा. शासकीय कन्या वसतीगृह, भिवकुंड (विसापूर) यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी राजू मिलमिले, रा. तिलक वॉर्ड, बोर्डा, ता. वरोरा यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.मिम्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन संतोष येलमुले, रा. सुब्बई, ता. राजुरा यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय बाबुराव सोनुने, रा. हुडको कॉलनी, अमर चौक, चंद्रपूर यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप रंगलाल शाहा, रा. मच्छीनाला, मुक्तीकॉलनी, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved