Breaking News

खळबळ शहर टाकळी मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत मर्डर

शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या वादातून एकास मारहाण शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू तालुका हादरला

विशेष प्रतिनिधी-अविनाश अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी गावांमध्ये दोन मे वार गुरुवारी रात्री साडेदहा वाजता लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त म छबिना मिरवणुकीमध्ये जुन्या किरकोळ भांडणावरून सात ते आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून अक्षय आप शेटे राहणार शहर टाकळी यास गंभीर जखमी केले रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान संबंधित प्रकार घडला असून त्यास अधिक उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.

शेवगाव पोलीस स्टेशन येथे त्याचा बंधू संकेत संजय आपशेटे वय 28 यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणे भा.द.वि. कलम 302, 143, 147, 148, 149, 323 प्रमाणे आरोपी क्रमांक 1} अजय दावीत कोल्हे 2} किरण उत्तम चव्हाण 3} पंकज लक्ष्मण कोल्हे 4} अविनाश साईनाथ पवार 5} विकास संजय कोल्हे व यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार इसम होते असा गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना पाहणाऱ्या प्रत्यक्ष दर्शनी दोन तारखेला रात्री साडेदहा वाजता लक्ष्मी देवी मंदिराजवळ स्ट्रीट लाईट मध्ये सात ते आठ इसम घातक शास्त्रांनी अक्षय संजय आपशेटे वय 24 यास लाथा बुक्क्यांनी आणि घातक शास्त्राने जबर मारहाण करणताना पहिले संबंधित गुन्ह्यांमध्ये एक आरोपीस अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार झालेले आहेत गुन्ह्याचा तपास शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लवकरच फरार आरोपींच्या मुश्क्यावल्या जातील अशी शेवगाव पोलिसांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

*ताजा कलम*

जोपर्यंत संबंधित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता परंतु पोलीस प्रशासनाने चार दिवसांमध्ये त्वरित आरोपींना पकडण्याची हमी दिल्याने व गावातील इतर जेष्ठ मंडळींनी मध्यस्थी केल्याने अंत्यविधी करण्यास नातेवाईकांनी तयारी दर्शवली आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved