Breaking News

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आवारातील गेट जवळ एक अनोळखी इसम झोपलेल्या स्थितीत दिसल्याने त्यास वॉर्डबॉयने उठवून पाहिले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे सदर इसमास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील अपघात विभागात भर्ती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून सदर मृतक हा अनोळखी असून त्याची अजुनपर्यंत ओळख पटलेली नाही व त्याचे कोणीही नातेवाईक समोर आलेले नाही. मृतकाची ओळख पटविण्याकरीता नातेवाईकांचा शोध घेतला असता ते सुध्दा मिळू शकले नाही, त्यामुळे सदर अनोळखी मृतकाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मृतकाचे वर्णन : अनोळखी इसम वय अंदाजे 65 वर्ष, रंग काळा सावळा, चेहरा-लांबट, डोक्याचे केस बारीक पांढरे, दाढी मिशीचे केस पांढरे, उजव्या हाताला पंजापासून खांदयापंर्यंत दवाखान्याचे बॅंडेज बांधलेला, अंगात तपकिरी काळया लाईन असलेला मळकट फुल शर्ट, सिमेंट रंगाचा फुलपॅन्ट घातलेला अनोळखी पुरुष इसम.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

{ समस्या क्रमांक 03 } रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कोट्यावधींचा खर्च पाण्यात

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत देवटाकळी ते झोरापूर रस्त्यावर खर्च कोटींचा काम लाखात विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख …

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved