Breaking News

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा या ऋतूमध्ये कुठलीही तमा न बाळगता कामगार रात्र अहोरात्र न थांबता सतत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काम करीत असतात. आणि मिळालेल्या रक्कमेतून मुलांना उच्च शिक्षण देऊन सुखी जीवनाचे स्वप्न पाहत असतात. त्याकरिता २० ते ४० कि.मी. अंतरावरून सायकलने ये-जा करतात. अशाअनेक समस्यांवर मात करत आहेत. असे मार्गदर्शन करतांना ते भाऊक होऊन म्हणाले, माझे वडील एका खाजगी कंपनीत काम करीत होते. दरवर्षी कामगारांचा सत्कार व्हायचा. त्यात मी सुद्धा जात होतो. या कार्यक्रमाच्या अनुसंगाने माझ्या लहानपणीची आठवण मला झाली आहे. म्हणून कामगारांचा सत्कार व्हायलाच पाहिजे तसेच एक झाड जगण्यासाठी हजारो वर्ष लागत असून लाखो लोकांना एका झाडापासून शुद्ध ऑक्सिजनाच्या माध्यमातून जीवनदान मिळतो. मात्र ते झाड तोडतांना अनेकदा विचार करावा जेणेकरून पर्यावरणाला वाचविण्यासाठी सदैव प्रयत्न करावे असा संदेश दिला. आणि कामगाराविषयी आपुलकी जोपासणारे जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले आहे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी केले.

ते भंडारा येथील शिवम हॉटेल येथे वन पर्यावरण संरक्षण संस्था द्वारा संचालित राष्ट्रीय वन पर्यावरण प्रदूषण नियंत्रण संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य भंडाराच्या वतीने पर्यावरण परिषद तथा जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त असंघटित कामगार सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पर्यावरण समितीचे संस्थापक अध्यक्ष सोमेश्वर येलचलवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, सूर्यकांत इलमे, राष्ट्रीय पर्यावरण समितीच्या जिल्हाध्यक्ष सुनिता परदेशी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण व दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचा शाल व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

कामगारांना जो हक्क मिळाला आहे. तो हक्क सहजासहजी मिळालेला नाही. त्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम करून हक्क मिळवून दिले आहे. असे मार्मिक मत परमानंद मेश्राम यांनी मांडले. तसेच १ मे १०६० पासून आम्ही महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो यासाठी आमच्या पूर्वजांना संघर्ष करावा लागला. त्याकरिता १०६ थोर समाजसुधारक व नागरिकांना मरण पत्काराव लागले. त्यांची आठवण सर्वांनी लक्षात ठेवावे असे मत सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत ईलमे यांनी मांडले. तर होळी या सणानिमित्त हजारो टन लाकुड जाळून राख करतात. आणि मारबतीच्या नावाखाली लाखो परसाच्या झाडांची कत्तल करतात. त्यामुळे पर्यावरणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ते सर्वांनी प्रयत्न करून थांबविले पाहिजे असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णूदास लोणारे यांनी व्यक्त केले.

राज्यातील प्रत्येक कामगाराच्या सहकार्याने त्यांचे हक्क व अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे. तसेच राज्यात ग्लोबल वार्मिग सारख्या अनेक समस्या मानवाला भेडसावत आहेत. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय पर्यावरण समितीचे संस्थापक अध्यक्ष सोमेश्वर येलचलवार यांनी व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन कामगारांच्या समस्या कश्याप्रकारे सोडविता येतील व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील शंभरच्या असंघटित कामगारांचा जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व टिफिन डब्बा देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बडोले व प्रास्ताविक अजय वासनिक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कृष्णा ठवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजन राष्ट्रीय पर्यावरण समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष सुरज परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष विजय क्षिरसागर, सचिव दीपक वाघमारे, राजकुमार दहेकर, प्रमोद भांडारकर, शितल धकाते, नम्रता बागडे, नितेश बोरकर, लक्ष्मीकांत दांडेकर, त्रिवेणी वासनिक, रूद्रिका परदेशी, विलास केजरकर, रेखा हुकरे, निपाणे, रूपाली दहेकर, राकेश सांडेकर, वैष्णवी परदेशी, प्रशांत रणदिवे, नरेंद्र मस्के, वैशाली नागदेवे, बन्सोड, वासनिक, कांचन नेवारे, वैष्णवी तितरमारे, मेश्राम, एंजल ठवकर इत्यादी कार्यकर्ते व कामगारांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

{ समस्या क्रमांक 03 } रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कोट्यावधींचा खर्च पाण्यात

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत देवटाकळी ते झोरापूर रस्त्यावर खर्च कोटींचा काम लाखात विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख …

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved