Breaking News

वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई – अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त

 

अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यात रेती माफिया बिनधास्त सर्रासपणे खुलेआम दैनंदिन राजाश्रय असल्यासारखे मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी जंगलातुन तसेच उमा नदी पात्रातून केली जात आहे. आताची ताजी घटना दिनांक. २४/०१/२०२४ ते २५/०१/२०२४ ला झीरे बाबु नावाच्या रेती माफिया व सहकारी सोनू धाडसे या दोघांनी मिळून गस्तीवर असलेल्या सेवानिवृत्त माजी सैनिक तथा वनरक्षकास बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतांना चिमूर पोलीस स्टेशन येथे भा.द.वी. कलम ३५३,२९४,५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असूनही दोन्ही आरोपी मात्र खुलेआम चिमुर शहरात मोकाट फिरत आहेत.या गुन्ह्यात सजेचे प्रावधान असून पोलीस प्रशासन व वनविभाग सुस्त बसल्यागत दिसून येत आहे.

असे असतांना सुध्दा माफियांमध्ये भीती का नाही ? परत पुन्हा दिनांक.३१/०१/२०२४ बुधवार ला सायंकाळी ०६ः१० मिनिट झाले असता च्या सुमारास चिमूर वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाचे कर्मचारी आर.मेश्राम क्षेत्र सहाय्यक चिमूर, अक्षय मेश्राम वनरक्षक नियतक्षेत्र चिमुर, कु. एल. बी. बोनगीरवार वनरक्षक झरी , व इतर मजुरासह कक्ष चिमूर बिट क्रमांक. ३६८ मध्ये गस्तीवर असतांना जंगलात वाहनाचा कर्कश असा आवाज आला असता खात्री करण्यासाठी वनरक्षक गेले असता वनक्षेत्रातील नाल्यावर जेसीबी च्या साहाय्याने रेतीचा उपसा करण्याकरीता रॅम्प तयार करतांना आढळून आले.

त्या माफियांना विचारणा केली असता रेती काढण्यासाठी रॅम्प तयार करीत आहो असे त्यांचेकडून स्पष्ट पणे सांगितले.व सदर प्रकरणाची माहीती के.बी.देऊरकर,वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांना दिली असता ते तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यानंत्तर अवैधरित्या वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करणारे जेसीबी मशीन जप्त करुन वनपरिक्षेत्र कार्यालय चिमूर येथे आणुन भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम ३३(१), अ, ब, ४१ व ४२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

सदर कार्यवाही उपवनसंरक्षक, ब्रहपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, सुनिल हजारे, सहाय्यक वनसंरक्षक (तदू), ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी के. बी. देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या जप्त कार्यवाहीत आर. डी. मेश्राम, क्षेत्र सहाय्यक, चिमूर यु, बी, लोखंडे, क्षेत्र सहाय्यक, मुरपार आर.डी.नैताम,वनपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) खडसंगी (चिमूर),ए.पी.पोटे,वनरक्षक (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) खडसंगी (चिमूर)आर.बो.केदार,वनरक्षक नियतक्षेत्र भान्सुली ए. एम. मेश्राम, वनरक्षक नियतक्षेत्र चिमूर आर.डब्लू हजारे, वनरक्षक नियतक्षेत्र गदगाव,कु.एल.बी.बोनगीरवार, वनरक्षक नियतक्षेत्र झरी,तसेच अविनाश डफ, विनोद श्रीरामे व रविंद्र नन्नावरे यांनी सहकार्य केले.

** माफियांची दादागिरी वाढू लागल्याने वन व महसूल तसेच पोलीस यांनी एकत्रित येणे गरजेचे **

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved