Breaking News

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र, जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप, करियर मार्गदर्शन व अभ्यास चे महत्व याचा सल्ला

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नाशिक:-छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक तथा उद्योजक शरद (अण्णा) पवार यांचा हस्ते जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रम ची सुरुवात पसायदान ने करण्यात आली.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे नाशिक येथे जैन गुरुकुल वसतिगृह येथे भेट देऊन विविध प्रकारच्या समस्या ची माहिती घेतली व छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सर्व प्रकारचे प्रश्न व समस्या सोडवण्यास मदत व सहकार्य केले जाईल, असा शब्द छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे देण्यात आला. तसेच छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सर्व प्रकारचे मदत व सहकार्य मोफत केले जात असते, कारण सेवा ही मोफत केली जाते. पैसे घेऊन जो कोणी व्यक्ती, संस्था व संघटना काम करते, जो कोणी समाजसेवा साठी पैसे घेतो तो दलाल असतो, असं छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सांगण्यात आले. छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सर्व प्रकारचे कार्य मोफत केलं जाते.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक शरद (अण्णा) पवार यांनी सर्व अनाथ मुलांना आपल्या जीवनातील मनाचा ताबा, मनाची एकाग्रता, स्थिर मन अस्थिर मन, चंचल मन, अंर्तमन, उत्साह, जिद्द, चिकाटी, धाडस, ध्येय व करियर वर सखोल व सविस्तर मुद्दे मांडले.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद पवार यांनी सर्व अनाथ मुलांना आई बाबा स्वप्न पूर्ण करण्यासाठी युगे युगे कष्ट व मेहनत करून पुढे कस जाता येईल, अभ्यास का करावा, अभ्यास चे महत्व व अभ्यास वेळ किती व कशा प्रकारे असावी यांचा वर तंतोतंत विषय नुसार मार्गदर्शन केले.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक उद्योजक शरद पवार यांनी गुरुकुल वसतिगृह अनाथ मुलांना एमपीएससी परीक्षा, यूपीएससी परीक्षा व स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बना, देश सेवा करा असा सल्ला दिला.

जैन गुरुकुल वसतिगृह विशेष भेट प्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश चे महासचिव व कायदेशीर सल्लागार adv. अलका मोरेपाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ. ज्योतीताई परदेशी , नाशिक शहर महिला आघाडी अध्यक्ष adv. उषाताई पगारे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शामराव सुतार, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गौरव तिडके, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष योगिता सुतार मॅडम, हभप. लक्ष्मण महाराज, नीलिमा मॅडम, adv. योगिता मॅडम व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved