Breaking News

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, पुजारी यांच्या नोंदी होणार रद्द. काळी आई होणार देवस्थान मालकीची. वर्ग 3 ब म्हणून होणार नोंद. देवस्थान मालकीच्या जमिनी काही पुजारी,कब्जेदार, वहिवाटदार यांनी शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून संगनमताने वर्ग बदलून सातबारा मध्ये देवस्थानचे नाव वगळून कब्जेदार सदरी मालक म्हणून बेकायदेशीर नोंदी केलेल्या आहेत त्यांच्यावर होणार फौजदारी कार्यवाही.तसेच देवस्थान जमिनींचा बेकायदेशीर पणे मालकी हक्क दाखवूनज ग्रामपंचायतीच्या पूर्व परवानगीशिवाय विहिर खोदकाम,पाईपलाईन द्वारे पाणी नेऊन बेकायदेशीर बदल करणे, कार्यवाही पात्र आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती बोपन्ना यांच्या खंडपीठाने महत्वपूर्ण निवाड्यात महाराष्ट्रातील हजारो देवस्थानांना होणार फायदा. या निर्णयामुळे देवस्थान मालकीच्या जमिनीवर कब्जेदार अथवा पुजारी यापुढे राहणार नाहीत महाराष्ट्रातील जमिनी व देवस्थान वतन स्वरूपाचे असल्यामुळे त्याला कूळ कायदा लागू होत नाही .

पुजारी आणि त्यांच्या वारसांनी अशा हजारो एकर जमिनीची विल्हेवाट आतापर्यंत लावली व कोट्यवधी रुपये बेकायदेशीरपणे मिळवले आहेत व संपूर्ण गावाला बेकायदेशीरपणे वेठीस धरल्याचे आढळले आहे.महाराष्ट्र मध्ये ज्या ठिकाणी देवस्थान मालकीच्या जमिनी परस्पर पुजारी यांनी कब्जेदार व संगनमताने वर्ग २ मध्ये बदल करून मालकीहक्क सदरात नोंदी केलेल्या आहेत त्यांच्या नोंदी ह्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ग्रामसभेच्या एका ठरावाद्वारे अथवा सामाजिक संघटनेच्या मागणी द्वारे अथवा गावातील कुठल्याही नागरिकाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज केल्यास बेकायदेशीर नोंदीहोणार रद्द. तसेच देवस्थान व देवस्थान मालमत्ता यांची धर्मदाय आयुक्त यांच्याकडे होणारी सरकारी नोंद.भविष्य काळामध्ये मंदिर देवस्थान मालमत्ता यांची निगराणी करणार शासकीय नोंदणीकृत देवस्थान समिती.माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा महत्त्वपूर्ण निकाल.

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता /पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved