Breaking News

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा करून पसार झालेल्या मातृ तीर्थ बुलढाणा को-ऑपरेटिव सोसायटीच्या त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप शेवगाव शहरातील नेवासा रोडच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान या बँकेचे दोन लीडर तथा संचालक भामट्यासारखे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आले असता त्यांच्यावर पळत ठेवून असलेले शेकडो गुंतवणूकदारां पैकी मोजके लोक तिथे पोहोचले त्यांना शंभर प्रश्न विचारून भंडावुन सोडले उडवा उडवी ची उत्तरे देता देता त्या दोन लिडरच्या नाकी नऊ आली आमच्या जमिनीचा व्यवहार झाला की एक महिन्यांनी तुमचे पैसे देऊ असे संताप जनक उत्तर त्यांनी संबंधित गुंतवणूकदारांना दिल्यामुळे चिडलेल्या गुंतवणूकदारांनी एसबीआय बँक परिसरामध्ये दे दना दन करून लोकांना गंडविणारे आणि दर सहा महिन्याला नवीन स्कीम आणणारे त्या दोन भामट्या तथाकथित संचालक उर्फ लीडरची पाचावर धारणा बसवली आता जर गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले नाही तर भविष्यात लोकांची रस्त्यावर कपडे फाडून वरात काढल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती शेकडो गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे दुसऱ्या एका लिटरच्या दुकानाला दोन गुंतवून दादांनी स्वतःचे कुलूप लावून ज्यावेळेस स्वतःकडे घेतल्याची चर्चा आहे आता लीडर लोकांची अवस्था “भीक नको पण कुत्रा आवर” अशी झाली आहे.

*ताजा कलम*

“मी शेवगावकर” णे गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये केलेला पाठपुरावा यामुळेगाढ झोपेत असलेल्या शेकडो गुंतवणूकदारांचे खाडकन उघडलेले डोळे यामुळे वातावरण निर्मिती होऊन आज धरून हाणले उद्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन काही लोक E.O.W. आणि M.P.D.S. कायद्या अंतर्गत सुद्धा दाखल करणार आहेत लोकांच्या पैशांचे जीवावर मजा हजा करणारी हे भामटे संचालक जेव्हा जेलची हवा खातील तेव्हा त्यांची अक्कल ठिकाणावर येईल असे वाटते

{ क्रमशः }

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved