Breaking News

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत जायकवाडी उजव्या कालव्यात हातगाव शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे*

विशेष प्रतिनिधी-अविनाश अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गुरवारी सकाळी साडे सात वाजता घरातून निघून गेला असल्याची खबर पोलिसांना त्याचे मामा शिवाजी तुकाराम घोलप यांनी दिली होती. ग्रामस्थ व नातेवाईकानी इतरत्र त्याचा शोध घेतला मात्र आढळून आला नाही. मात्र त्याची मोटारसायकल हातगाव शिवारात जायकवाडी जलाशया लगत ग्रामस्थांना आढळली, तर आज शुक्रवारी दुपारी एक च्या सुमारास नागेश गलांडे याचा मृत्यू देह कालव्यात तरंगताना आढळून आला.

त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस हवालदार नानासाहेब गर्जे घटनास्थळी हे दाखल झाले ग्रामस्थांनी कालव्यातून प्रेत बाहेर काढून उत्तर तपासणीसाठी प्रेत शेवगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेचे कारण मात्र अद्याप समजलें नाही.
सदर युवकाचे पाच दिवसांपूर्वी २८ तारखेला थाटामाटात लग्न झाले होते. अजून हळद फिटत नाही तोच हा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आईवडिलांना तो एकुलता एक मुलगा होता अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

*ताजा कलम*

युवकाचे लग्न त्याच्या मर्जी विरुद्ध झाले होते का ??? त्याच्यापुढे इतरत्र प्रेम संबंध होते का ??? पंचक्रोशीत असे चर्चा नौ उधाण आले आहे मयत युवका शांत मनमिळो स्वभावाचा असल्याने त्याच्या अकस्मात कृतीने पंचक्रोशी हळद व्यक्त केली जात आहे दुसरा एक तरुण तेजस अभंग याचा पैठणचे जलाशयामध्ये मृतदेह आढळल्याणे संपूर्ण गावावर शोक काळा पसरले आहे

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved