मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 16 मे 2024 वार गुरुवार समस्या शेवगांवच्या (समस्या क्रमांक 03) या सदरामध्ये देवटाकळी – हिंगणगाव ते जोहरापूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कोट्यावधीचा खर्च पाण्यात या बाबत खुलासा करण्यात येत आहे की या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजना या केंद्र सरकारच्या महत्वकांगक्षी योजने अंतर्गत टप्पा -03 मध्ये घेण्यात आले आहे.
या रस्त्याचे सर्वेक्षण केले त्या वेळेस या रस्त्याला खूप मोठं मोठे खड्डे असल्या मुळे चार चाकी व मोठी वाहनाची वाहतूक या रस्त्याने बंद होती व पाऊस पडल्यानंतर दोन चाकी वाहनासहित पूर्ण वाहतूक बंद होत असे. या रस्त्याचे काम हाती घेताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा रस्ता काळ्या मातीच्या भागामधून जात असल्यामुळे खऱ्या अर्थाने समस्या निवारण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा *(Soil stabilization अंतर्गत FDR)* या तंत्र ज्ञानाचा वापर करून करण्यात यावा,
अशा सूचना देण्यात आल्या त्यामुळे यातंत्रज्ञानाचा वापर करून अंदाजपत्रक तयार करण्यात आले व अंदाज पत्रकानुसार 8 लहान पूल व एक सेतू पूल बांधण्यात आला आहे व रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार करण्यात येत आहे. तसेच या रस्त्यावर मोठ्या नदीवर मंजूर असलेल्या पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या कामाला सुरवात करण्यात येईल. “तसेच या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची हमी पाच वर्षासाठी ठेकेदाराकडे आहे व त्यानंतर पाच वर्ष विभागा अंतर्गत रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार असल्याने दहा वर्ष रस्ता सुरक्षित राहणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने या रस्त्याची समस्या सुटली आहे”
*ताजा कलम*
*ग्रामीण भागातील काळ्या मातीतील रस्त्यांसाठी हे नवीन तंत्रज्ञान अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले असून यामुळे भविष्यामध्ये सुमारे पाच वर्ष हा रस्ता खचणार नाही आणि डांबरी सडकेवर खड्डे पडणार नाहीत त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची असते याची या भागातील रहिवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री. संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केले आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*