गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार प्रमुख विभागीय परिवहन अधिकारी आणि एस.टी.ची यंत्रणा खडबडून जागी पावसाळ्यापूर्वी होणार एस. टी. साठी रॅम्प ???
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी “मी शेवगावकर” णे सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार प्रमुख विभागीय परिवहन अधिकारी अहमदनगर आणि एस.टी.ची यंत्रणा खडबडून जागी पावसाळ्यापूर्वी होणार एस. टी. पार्किंग साठी रॅम्प शेवगाव शहराची भौगोलिक रचना पाहता निम्मे शेवगाव शहराचे पाणी बस स्थानकामध्ये जमा होते.
त्याचा त्रास प्रवाशांना आगारात काम करणाऱ्या कामगारांना होतो परंतु नवीन बांधकामासमोरील आवारात सुमारे चार ते पाच फुटांची भर टाकून काँग्रेसचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे त्यामुळे येत्या पावसाळ्यात होणारी काही सोय दूर होणार आहे असे आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना बस स्थानकाच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर श्री बाळासाहेब मुरदारे यांनी सांगितले बांधकाम 90% पूर्ण झाले असून एम. आय. डी. सी. च्या टेंडर मार्फत बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मच्या टेंडरची प्रक्रिया आचारसंहितेच्या काळात झाल्याने लोकसभेची आचारसंहिता संपताच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्लॅटफॉर्मच्या काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे त्यामुळे बहुप्रतीक्षित असलेले नवीन बस स्थानक कात टाकणार असून त्याचे लोभसवाणे रुपडे शेवगावकरांच्या सेवेला तयार होईल अशी अपेक्षा बाळगायला नाही.
*ताजा कलम*
*अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत बांधकामाची सहा महिन्यांची मुदत असताना सहा वर्षे रखडलेले बांधकाम अखेर पूर्णत्वाकडे आले आहे. परंतु बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण हा कळीचा मुद्दा आहे संबंधित अतिक्रमणधारकांना एस.टी. प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुमारे डझनभर नोटीसा काढल्या आहेत परंतु “मांजराच्या गळ्यात घंटा कोण” ??? बस स्थानक अतिक्रमण मुक्त झाल्याशिवाय नवीन बसस्थानकाला प्रवेशद्वार करता येणार नाही अशी खंत खाजगी मध्ये अधिकारी वर्ग बोलून दाखवत आहे* एसटीला भाडे बांधणारे दोन तीन दुकानदार सुद्धा त्यांची जागा मोकळी करून द्यायला तयार नाहीत प्लॅटफॉर्म चे काम होणार कसे???
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पञ्जर*