Breaking News

वरोऱ्यात गणरायाचे थाटात विसर्जन

शिवसेना ( उबाठा) वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केले गणेश मंडळाच्या सदस्यांचा स्वागत व सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, म्हणत वरोऱ्यासह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दिनांक 30 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व समस्त शिवसैनिकांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या सदस्यांचे स्वागत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो देऊन सत्कार केला.
शहरात सर्वप्रथम विठ्ठल मंदिर येथील मनाचा गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सर्व सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जनाला मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. डीजेचा ताल तर कुठे ढोलताशांचा कडकडाट आणि त्यावर बेधुंद होऊन ताल धरणारी तरुणाई विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.या विसर्जन विसर्जन मिरवणुकीत सहभागी भाविक भक्ताचे तसेच सार्वजनिक गणेश मंडळ व त्यांच्या सदस्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो देऊन सत्कार केला व बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांना चॉकलेटचे वाटप केले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठानी,उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, माजी उपजिल्हा प्रमुख वसंता मानकर , तालुका प्रमुख विपीन काकडे,माजी तालुका प्रमुख बंडू चटपल्लीवार,शहर प्रमुख संदीप मेश्राम, युवासेना समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, शहर संघटक व माजी नगरसेवक किशोर टिपले, माजी नगरसेविका शुषमा भोयर, माजी नगरसेविका दिपाली टिपले, माजी नगरसेविका प्रणाली मेश्राम , शिवदूत बंडू डाखरे, शिवदूत बालाजी जिवतोडे, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, उपतालुका प्रमुख सागर पिंपलशेंडे, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, उपतालुका प्रमुख अमोल काळे, शिवदूत मनीष ठक, शहर प्रमुख अनिकेत हिवरे, कामगार सेना तालुका प्रमुख हनुमान ठेंगणे , वाहतूक सेना तालुका प्रमुख रमेश सनस,शहर प्रमुख पियुष सिंग,युवती सेना तालुका प्रमुख तेजस्विनी हनुमंते,विभाग प्रमुख रोशन खोंडे, बंडू पाटेकर,जितेंद्र गुल्हानी,रमेश काटकर,वाल्मीक गौरकार, आकाश चतुरकर, प्रसाद खडसान, होमराज घुमे, राकेश टापरे, पियूष जगताप, किशोर ढवस, सिद्धार्थ सोयाम, दिव्यांनी चौधरी, कपिल धकाते,चेतन किन्हेकर, , पवन एकरे व आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व …

जंगलात लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

हत्या की आत्महत्या? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर तालुक्यात नेरी पासून जवळच असलेल्या रामपुर येथील जंगलातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved