Breaking News

माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांना मातृशोक

विशेष प्रतिनिधी-नागपूर

कामठी ता प्र 3:- पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष ,लॉंग मार्च चे प्रणेते व माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या ज्येष्ठ भगिनी व बिडी कामगारांचे हृदय सम्राट दिवंगत कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धांगिनी व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मातोश्री बौद्ध उपासिका आई 86 वर्षीय नलिनीताई कुंभारे यांचे वृद्धपकाळाने व अल्प आजाराने आज रात्री साडे नऊ वाजता नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दुखद निधन झाले, असून त्यांची अंत्ययात्रा कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे परिसर स्थित ड्रॅगन पॅलेस टेम्पल नजीकच्या ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या निवास स्थानातून निघत त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता कन्हान नदी मोक्षधाम परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.या दुःखद घटनेने ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कामठी शहर तसेच आंबेडकरी चळवळीत शोककळा पसरली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात …

राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले

भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved