जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारला रोटरी क्लब चिमूर तर्फे पोलिस बांधवांना पोलीस स्टेशन चिमूर येथे रोटरी क्लब परिवारातील महिला सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला. बहीण भावाचे पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास पोलिस बांधव सदैव दक्ष आणि सज्ज असतात.
आज संध्याकाळी 7 वाजता पोलिस स्टेशन चिमूर येथे आनंद उत्साहात पोलिस निरीक्षक संतोष बाकल व इतर पोलीस बंधूंना राखी बांधून त्यांच्यासोबत महिला भगिनींनी रक्षाबंधन साजरा केला.महिलांनी सर्वांना राखी बांधून आपले दायित्व पार पाडले.यामध्ये सौ.सपना गंपावार,सौ.राजश्री ताकसांडे ,सौ.अर्चना भोयर, डॉ.आश्लेषा लांडगे,सौ.सपना बेत्तावार,डॉ.पौर्णिमा खानेकर यांचा सहभाग होता.
यावेळी कार्यक्रमास चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल,रोटरी क्लब चिमूरचे अध्यक्ष रोटे.विशाल गंपावार, सचिव रोटे.कैलास धनोरे, कोषाध्यक्ष रोटे.पवन ताकसांडे,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रोटे.भोयर सर,रोटे.रोकडे सर,रोटे.प्रफुल बेत्तावार, रोटे.गुरुदास ठाकरे,कृषीमित्र रोटे.अभिजीत बेहते,रोटे.डॉ.महेश खानेकर उपस्थित होते.
टीप – वृत्तपत्र साठी