Breaking News

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

परिवहन महामंडळाच्या वतीने 22 व 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेअंतर्गत 12 पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय./ पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर/ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळ, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे 22 व 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टल वरून महामंडळाला अर्ज सादर केलेले आहेत, त्यांनी सुद्धा सदर तारखेला संपूर्ण शैक्षणिक मूळ कागदपत्रासह उपस्थित रहावे. तसेच इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात ऑफलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पिडीत वैद्यकीय विद्यार्थिनीचा समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनचे आंदोलन

कलकता येथील घटनेचा निषेध उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन चिमूर येथील डॉक्टराच्या आयएमए, …

चिमूर क्रांती दिनीनिमित्त अमर शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण

विकसित भारत आणि मजबूत भारत हेच आमचे ध्येय – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा प्रतिनिधी-सुनिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved