jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजाने उडाली नागरिकांची झोप
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर शहरातील मुख्य मार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई शारदा अंबिका पॉवर प्लॅन्ट समोर असलेल्या उमा नदि पात्रातील रेतीची खुलेआम उत्खनन करून महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा जमा करून ठेवला आहे. याच मार्गाने रात्रीला अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टरच्या साह्याने रेतीची वाहतूक केली जात असून काही दिवस भरारी पथक तयार करून ट्रॅक्टर पकडली गेली परंतु आता धडक कारवाई करणे बंद असल्याने बिनधास्त अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात आहे.
महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे अशी चर्चा जनतेत रंगली आहे.रात्रीला नागरिक झोपले असतात मात्र रात्री १२:०० वाजताच्या नंतर रेतीची चोरी करणारे रेती चोरटे तस्कर १० ते १२ ट्रॅक्टर ने बिनधास्त पणे मुख्य मार्गाने ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजात रेतीची वाहतूक करतात. त्यामुळे नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे.याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.