jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- नर्सिंग क्षेत्रातिल प्रतिष्ठीत समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल आंतरराष्ट्रीय परिचारिका पुरस्कार वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना मा.प्रकाशजी आबीटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री व खासदार धर्यशील माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दिनांक १२ मे २०२५ ला राजश्री शाहू महाराज सभागृह कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल नर्सेस पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित खासदार धर्यशल माने, प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री, डॉ नितीन आंबाडेकर संचालक आरोग्य सेवा मंडळ मुंबई, डॉ पुरुषोत्तम मडावी उपसंचालक शुश्रुषा आरोग्य सेवा मंडळ मुंबई, डॉ निलिमा सोनवणे सह.संचालक शुश्रुषा आरोग्य सेवा मुंबई, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय सहा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.त्यामध्ये वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना धर्यशिल माने खासदार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका यांना प्रदान करण्यात आला.