
सर्वे करण्याचे दिले महसूल विभागाला निर्देश
संग्रामपुर [ प्रतिनिधी ]
गेल्या दोन दिवसांचा आदी पावसाने खरीप हंगामातील पिकांचं जबर नुकसान केलं संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकसानाची केली पाहणी,
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड,वरवट ,एकलारा या परिसरातील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतातील बांध फुटल्याने सदर शेतात तुन पावसाचे पाणी वाहुन गेल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे गेल्या पंधरा दुवसा पासून पाऊस पडला नसल्या मुळे बऱ्याच पैकी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तसेच काही शेतकऱ्यांचे पेरलेली बीज गे उगवलेच नाही हे संकट निर्माण होतात दुसरे संकट अतिवृष्टी पावसामुळे सदर शेतात मोठया प्रमाणावर पाणी साचले या या परिसरातील शेतकरी बांधव अधिकच संकटात सापडले आहेत तसेच वरवट बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पावसाचे पाणी साचल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेले धान्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असता अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा खासदार प्रतापराव जाधव यांनी दि २९ रोजी तालुक्यातील वानखेड,दुर्गादैत्य,शेत शिवारातील नुकसानाची पाहणी केली तसेच वरवट बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरात धान्याचे झालेल्या नुकसान व एकलारा येथील पावसाच्या पाण्यामुळे फुटलेला तलावाची पाहिणी करून आढावा घेतला सदर नुकसानाचे पंचनामा करून तात्काळ नुकसान ग्रस्त यांना नेसर्गिग आपत्ती व्यवस्थापन कडून न्याय मिळवून देण्याचे जाहीर केले यावेळी शेतकरी बांधव व कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी यांनी आपल्या समस्या खासदार जाधव यांच्या कळे मांडल्या असता त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहेत राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी हताश होऊ नये असा दिलासा खासदारांनी शेतकऱ्यांना दिला. सरकारी मदत मिळेल तेव्हा मिळेल पण थेट खासदार बांधावर पोहोचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांताराम दाणे,संग्रामपूर तालुका प्रमुख
रवि झाडोकार, ऊमेश पाटिल, उपतालुका प्रमुख कैलाश कडाळे,राष्टवादी तालुका अध्यक्ष नारायण ढगे, भया घिवे,राजु भारसाकडे, दुर्गासिग सोळंके,वरवट चे सरपंच श्रीकृण दातार ,वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद अस्वार,भगवान पवार,रवी भाडेकर,राजू आमटे,
महसूल विभागाचे प्रभारी तहसीलदार समाधान राठोड,गटविकास अधिकारी चव्हाण,तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे,तलाठी विनोद भिसे यांच्या सह वानखेड,वरवट,एकलारा शेतकरी व आदी प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती
नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेले खासदार जाधव यांना आमदार डॉ कुटे यांनी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी पदाधिकारी प्रशासकीय यंत्रणा यांच्या जवडून बाजूला एकांतात नेऊन केली चर्चा ही या नुकसाच्या दौरावर आलेले खासदार जाधव व एकांतात झालेली चर्चेला जातआहे