Breaking News

उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे ऑल इंडिया प्रोफेशनल कॉग्रेस तर्फे महारक्तदान शिबिर संपन्न

(रक्तदान शिबिराला पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची उपस्थिती)

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- दिनांक 16/08/2021 सोमवार ला कोरोना सारख्या महामारीच्या काळा मध्ये गोर गरीब जनतेला रक्ताची गरज भासत असता रक्त विकत घेऊन उपचार करणे शक्य नसून रक्ताचा तुटवडा अभवी अनेक लोकांना आपला प्राण गमवावे लागले अनेक रुग्ण रक्त उपलब्ध न झाल्याने जिवासी मुकले आहे. या कोरोना महामारी मध्ये हाताला काम नाही व खिशात रुपया नाही अशी परिस्थिती आज जनतेची होऊन बसली आहे ही बाब ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस चिमूर गडचिरोली मतदार क्षेत्र या संस्थेला लक्षात घेऊन महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महारक्तदान आयोजन ॲड. शनैशचंद्र गुलाबराव श्रीरामे अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र यांचे पुढा कारातून उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे महारक्तदान शिबीर संपन्न झाले
या कार्यक्रमासाठी उपस्थित पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते रक्त दातान्या प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले रक्त दान शिबिरात ॲड. शनैशचंद्र श्रीरामे बोलताना म्हणाले कि आज शाहिद क्रांती दिना निमित्य हा उपक्रम घेण्यात आला. रुग्णालयामध्ये रुग्णाना खारीचा वाटा मिळावा या उद्देशाने रक्तदान घेण्यात आले.यावेळी उपस्थितीत
डॉ.अनंत हजारे सक्रंमण अधिकारी, डॉ.भगत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संजय गावीत वैद्यकीय समाज सेवा अधिकारी,जय पचारे रक्तपेटी वैज्ञानिक अधिकारी,अमोल जिद्देवाररक्तपेटी वैज्ञानिक अधिकारी, योगेश जांदुडे अधिपरोचर,चेतन वैरागडे सहायक,रुपेश घुमे वाहान चालक,
डॉ.सुमेध साखरे, प्रशांत डवले, सोनलचंद्र गुलाबराव श्रीरामे,नमन अरुण लोखंडे, संदिप हिंगे, पुरुषोत्तम शेंडे, कैलास देठे, प्रविण शेंडके,शुभम खोब्रागडे,व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 …

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved