Breaking News

क्रांती दिनी चिमूर जिल्ह्याच्या मुद्द्यावर बीजेपी-काँग्रेस ची नौटंकी व जनतेची दिशाभूल – आप चा आरोप

पालकमंत्री व आमदार दोघेही जनतेची दिशाभूल करण्यात तरबेज- प्रा. डॉ. अजय घ. पिसे

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- नुकत्याच पार पडलेल्या १६ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बीजेपी व काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रम राबविण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती दिनी चिमूर जिल्हा झाला पाहिजे याची आठवण दोन्ही पक्षांनी ठेवली व तसे दाखविले. काँग्रेस पक्षातर्फे लहान-मोठ्या नेत्यांनी मोठमोठे पोस्टर लाऊन शक्तीप्रदर्शन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला परंतु यातून काँग्रेस पक्षातील टोकाला पोहचलेली गटबाजी व पडलेले खिंडार याचेच मुख्य प्रदर्शन झाले. पालकमंत्र्यांनी क्रांती दिनाचे औचित्य साधून चिमूर जिल्हा बनविण्यासाठी असलेल्या अडचणीचे नेहमीचेच रडगाणे गायिले. सत्ता असूनही जिल्हा बनविण्यास असमर्थता दाखविणे म्हणजे जनतेला पुन्हा पुन्हा मूर्ख बनविणे होय. फक्त निवडणुकीसाठी हा मुद्दा तेवत ठेवायचा आणी अधून मधून जनतेला मूर्ख बनविण्याचे काम करण्यात काँग्रेस पक्षातील सर्वच लहान-मोठे नेते तरबेज झालेले दिसत आहेत.

पाच वर्ष सत्तेत असतांना आणी बीजेपी चा मुख्यमंत्री असतांना चिमूर येथील विध्यमान आमदार यांना चिमूर जिल्ह्याचा इतका कळवला कधीच आला नव्हता, या दरम्यान चिमूर जिल्ह्यासाठी यांनी कधी आंदोलन, रैली काढल्याची नोंद नाही किंवा विधानसभेत याबद्दल एकही अक्षर यांच्याकडून उच्चारला गेला नाही. आता मात्र विरोधी पक्षात असतांना चिमूर जिल्ह्यासाठी बीजेपी तर्फे रैली व आंदोलन करण्याची नौटंकी सुरु झाली आहे. जनतेला पुन्हा पुन्हा मूर्ख बनविण्याच्या कलेत बीजेपी आणी काँग्रेस दोघेही तरबेज झालेले आहेत असा आरोप आम आदमी पार्टी चे चिमूर-नागभीड विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी केला आहे.
स्थानिक आमदार व त्यांच्या काही समर्थकांवर परवानगी विना रैली काढून गैरवर्तणूक केल्याबद्दल गुन्हे दाखील झाल्यामुळे आपली नाचक्की झाकण्यासाठी तिरंगा रैलीत ‘भारत माता की जय’ च्या घोषणा केल्यामुळे गुन्हे दाखिल करण्यात आले असे भासविण्याचा केविलवाना व हास्यास्पद प्रयत्न सोशल मिडिया वर मेसेज फिरवून भाजपचे कार्यकर्ते करीत असल्याचे दिसून येते. या प्रकरणामुळे बीजेपी ची लबाडी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. चिमूर जिल्ह्याचा मुद्दा हा चिमूर येथील जनतेच्या भावनेशी जुडलेला आहे. या मुद्द्यावर जनतेला पुन्हा पुन्हा मूर्ख बनवून आपली राजकीय पोळी शेकण्याचा डाव आता जनतेच्या पूर्ण लक्षात आलेला आहे. बीजेपी व काँग्रेस च्या या नौटंकी चा जनतेसमोर भांडाफोड आम आदमी पार्टी नेहमीच करील असा ईशारा आम आदमी पार्टी तर्फे देण्यात आला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

धम्मकिर्ती बुद्धविहार मे बुद्धधातू प्रतिष्ठापना दिन हुवा संपन्न

धम्मकिर्ती बुद्धविहार मे बुद्धधातू प्रतिष्ठापना दिन हुवा संपन् जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिनांक 29 नोव्हेंबर को …

नागभीड उपविभागातील 60 शेतकऱ्यांना बारामती येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभागातर्फे पुणे जिल्ह्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved