
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर पोलिसांनी आज चिमूर शहरातील मुख्य महामार्ग व बाजारपेठ मार्गाने रूट मार्च काढला, रस्त्यावरील दुकान लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदार व बेशिस्तपणे आपली वाहने कुठेही उभी करणाऱ्यांना पोलिसांनी माईकद्वारे कारवाई करण्याची सूचना यावेळी देण्यात आली.
रस्त्यावरील वाहतुक मोकळे असावेत, कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, रस्त्यावर अतिक्रमण करु नये, योग्य ठिकाणी व्यवसाय करावा, अशा सूचना देण्यात आल्या. सूचना पाळल्या नाही तर कारवाई करण्याचा इशारासुद्धा रूट मार्च दरम्यान देण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (आय पि.एस.), पोलीस निरीक्षक नितीन गभने पो उप निरिक्षक राजू गायकवाड, सहाय्यक पो. निरिक्षक मंगेश मोहोड, अलिम शेख व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.