
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
संराडी :- तिरोडा तालुक्यातील संराडी गावात दारूबंदी असताना काही अवैद्य व्यवसायिका कडून गावात दारू विक्री करण्यात येत असल्याची माहीती दारूबंदी समितिच्या महीलांना मिळाली.
यावर सदर समितीच्या महीलांनी याची माहीती पोलीसांना देत बुधवारी 8 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास दारू पकडुन पोलीसांच्या स्वाधिन केले.
गावात दारूबंदी असताना आरोपी राजेश सदाशिव बोकडे हा व्यक्ति गावात अवैद्य दारू विक्री करीत असल्याची कुणकुण दारूबंदी समिति च्या महीलांना लागताच या महीलांनी बुधवारी सापडा रचला. यावेळी आरोपी राजेश हा गावात विक्री साठी दारू घेऊन येताना दिसुन आला. त्याला थांबवुन तपासणी केली असता त्याचाकडे 90 मीली चे 78 तर 180 मिली चे 8 व एक बॉटल हातभट्टीची दारू अशा 2 हजार 806 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदर आरोपीला मुंडी कोटा पोलीस चौकीतील पोलीस हवालदार साठवने, भाटीया, पोलीस नायक रामटेके यांच्या स्वाधिन करन्यात आले. यावेळी तंटामुक्त गाव समिति चे अध्यक्ष उत्तरा भोगांडे, रोशनी फोफसकर, लिलाबाई लिललारे,भुखडाबाई शेंडे, वर्षा गोस्वामी, शैलेष फोफसकर, महेंद्र फोफसकर अनमोल गुरु बैले, बबलू देवगढ़ यांनी या मोहीमेत पुढाकार घेतला.