Breaking News

जादुटोना प्रकरणी बेपत्ता झालेला व्यक्ती दहाव्या दिवशी घरी परतला

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत मिंडाळा येथील व्यक्ती जादूटोना करून पैसे गायब करण्याच्या संशयावरून मार खाऊन लापता झाला होता. तो बेपत्ता पिडीत व्यक्ती सलग दहाव्या दिवशी घरी परतला. मिंडाळा ( टोली) येथे जादूटोनाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत जखमी झालेला अशोक उपासराव कामठे (५१) हा काल दिनांक ९ सप्टेंबर रोजी नागभीड तालुक्यातील वाढोना येथे आपल्या बहीणीच्या घरी नागभीड पोलीसांना मिळून आला.

त्याला पोलीस स्टेशन नागभीड येथे आणुन त्याचे घटनेबाबत बयान नोंदवून त्याचे मारहाण बाबतीत ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
व त्याला गावातील पोलीस पाटील यांचे समक्ष त्याच्या घरी सुखरूप पोहचवण्यात आले . त्याचे घरी आई ईंदीराबाई कामठे व बहीण यशोदा नान्हे यांच्या ताब्यात देण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

शेवगाव शहरात रामनवमी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

*सकल हिंदू समाजसेवक शहर आणि तालुका यांच्या वतीने पालखीचे आयोजन ऐतिहासिक राम मंदिरात जन्मोत्सव सालाबादप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved