
पोलीसांनी कारवाई करीत पाच व्यक्तीस केली अटक
चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांना पोलिसांनी केली अटक
जिल्हा प्रतिनिधी/सुनिल हिंगणकर
वरोरा :- येथील धाब्यावर मागील दोन दिवसापूर्वी जुव्वा भरवला होता तो जुगार जवळपास 10 लाखांचा असल्याची चर्चा असून पाटाला माजरी परिसरातील एका प्रतीक पारखी नामक वेकोली कर्मचारी यांनी या जुगारात जवळपास 8 लाख रुपये जिंकले होते. पण हे पैसे जिंकल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते आणि त्यांचे इतर सहकारी यांनी प्रतीक पारखी यांना मारहाण करून त्याच्या जवळचे पैसे हिसकावून त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती असून जबर जखमी झालेल्या प्रतीकला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र ते वेकोली कर्मचारी असल्याने त्यांना परत वेकोली मांजरी च्या रुग्णालयात दाखल केले पण प्रक्रुती चिंताजनक असल्याने नागपूर च्या रुग्णालयात त्याना काल भरती करण्यात आल्याची माहिती असून पोलिसांनी या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्यासह त्यांच्या पाच सहकारी यांना अटक केली असल्याची माहिती आहे.