
“आचार संहिता तक्रार निवारण कक्ष कार्यरत”
“टोल फ्री क्रमांक 1950 वर करता येईल
आचार संहिता भंगाची तक्रार”
नागपूर दि.23 पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत आचार संहिता तक्रार निवारण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.तसेच टोल फ्री क्रमांक 1950 वरही आचारसंहिता भंगाची तक्रार करता येईल ..
नागरिक प्रत्यक्ष येवून या कक्षात तक्रार नोंदवू शकतात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टोल फ्री क्रमांक 1950 वर सुध्दा तक्रार करु शकतात,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर.यांनी कळविले आहे.