
तहसीलदार सह नायब तहसीलदार, अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी पदे रिक्त
तात्काळ रिक्त पदे भरा चिमूर तालुका शिवसेनेचे मुख्यमंत्री, महसुलमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चंद्रपुर जिल्हातिल सर्वात मोठा तालुका असलेल्या चिमूर तहसील कार्यालयमधे तहसीलदार मंजूर पदे 1 असून ते रिक्त आहे, नायब तहसीलदार 4 पदे मंजूर असून त्यापैकी 2 पदे रिक्त आहेत, अव्वल कारकुन 8 पदे मंजूर असून 3 पदे रिक्त आहेत, महसूस सहाय्यक 13 पदे मंजूर असून 8 पदे रिक्त आहेत शिपाई 5 पदे मंजूर असून 2 पदे रिक्त आहेत पुरवठा विभागात अव्वल कारकुन 2 पदे मंजूर असून 1 पद रिक्त आहे, लिपिक 4 पदे मंजूर असून 3 पदे रिक्त आहेत, शिपाई 5 पदे मंजूर असून 4 पदे रिक्त आहेत, महसूल आस्थापना व पुरवठा विभाग या दोन्ही विभागात ऐकून 42 पदे मंजूर असून 24 पदे रिक्त आहेत,
हि पदे रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाजात खोळम्बा निर्माण होत आहे, ग्रामीण भागातील जनतेला या रिक्त पदामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे, चंद्रपुर जिल्ह्यातिल सर्वात मोठा तालुका असलेल्या चिमूर तहसील कार्यालय मधे सर्व पदे भरने आवश्यक आहे, चिमूर तालुक्यात कर वसुलीचे प्रमाण मोठे आहे, तसेच इतर तालुक्यापेक्षा चिमूर तालुका लोकसांखेने मोठा आहे, या तालुक्यात शहरीकरण व औद्योगिकीकरन मोठ्या प्रमाणात झाले आहे, तहसील कार्यालयातील अत्यल्प कर्मचारी संखेमुळे अनेक कामे प्रलंबित राहत आहेत,
तहसीलदार, नायब तहसीलदार, अन्न पुरवठा विभाग, सांख्यकी विभाग, सामान्य प्रशासन विभागासह अव्वल कारकुन, कारकुन, शिपाई, असि पदे रिक्त आहेत, चिमूर तहसील कार्यालयात रिक्त असलेल्या पदाचा सहानुभूतिपूर्वक व सकारात्मक विचार करुन हि सर्व पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, व महसुलमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली,या वेळी चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे, चिमूर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ.माधुरी केमये, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, तालुका संघटक रोशन जुमड़े, चिमूर शहर प्रमुख अनंता गिरी, विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, कवडू खेड़कर, बंडू पारखी, सुधीर नन्नावरे, आशीष बगुलकर, शंकर सातपुते, सौ. भारती भिलकर , प्रसिद्धि प्रमुख सुनिल हिंगणकर उपस्थित होते,