Breaking News

वनविभागाची अवैध सागवान साठ्यांवर धाड

चिमूर वनविभागातील खडसंगी उपवनक्षेत्रातील बंदर येथील घटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर प्रादेशिक वनविभागा अंतर्गत खडसंगी उपवन क्षेत्रातील ब़ंदर (शिवापूर) गावात गुप्त माहीतीच्या आधारे रात्री 12 वाजताच्या दरम्यान अवैद्य सागवान तस्करांच्या घरी धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी सृजल मेश्राम राहणार बंदर (शिवापूर) अविनाश सती कोसरे (खडसंगी) सुरेश खडसान (खडसंगी) येथील रहिवासी असून यांच्या घरी अवैद्य सागवान असल्याचे वनविभाग यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार चिमूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी व गस्त पथक वन विभाग यांनी वरील आरोपीचा घरी धाड टाकली असता अवैध सागवान, पाट्या, खाटेचे ठावे व काही सागवान चे ओंडके असा माल जप्त करण्यात आला.

 


त्यात वनविभागाने दिलेल्या माहिती नुसार 0.179 व 0.191 घनमिटर सागवान असुन अंदाजे 15 हजार रूपयाचा अवैध सागवान माल जप्त करण्यात आला. सदर सागवान मालाचा वनविभागाद्वारे जप्त मालाचा पंचनामा करण्यात आला. असून वनविभागात मोठी खळबळ माजली आहे. आरोपीला वनविभागाने अटक करुन बयाण नोंदविण्यात आले.
ही कारवाई चिमूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यु.एस.नैताम, क्षेत्रसहाय्यक आर.डी. नैताम, फिरते पथकचे के.डी. गायकवाड, डी.जी मैद वनरक्षक कु. ढोके, वनरंक्षक मेश्राम आदीनी धाड टाकुन अवैध सागवान जप्त करण्यात आले. मात्र नेमका हा सागवान माल वनविकास महामंडळच्या की, प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातील माल आहे का? याबाबत वनविभागाकडुन चौकशी होणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

देशी बनावटीचे अग्निशस्त्र व दारुगोळा अवैधरित्या बाळगणारे इसमास अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * पोलीस स्टेशन मुल ची कामगिरी * जिल्हा …

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड – रोजगार मेळाव्यात 20 जणांना नियुक्तीपत्र प्रदान

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved