
नागपुर (ग्रा) :- ग्रामपंचायत कापसी (खुर्द) व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा च्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ९ ऑक्टोबर ला ग्रामपंचायत कार्यालय कापसी (खुर्द) येथे भव्य आरोग्य शिबीर घेण्यात आले, ज्यामध्ये जवळपास ३०० नागरीकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबीर मध्ये २९ प्रकारच्या औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठी नुसार तपासणी झालेल्या नागरीकांना देण्यात आले.
आरोग्य शिबीर मध्ये नागरीकांची जनरल तपासणी, डोळे तपासणी, रक्ताचे नमुने घेऊन रक्त गट रिपोर्ट, बि. पी, शुगर, RTPCR कोरोना टेस्ट इत्यादी सेवांचा समावेश होता या करीता स्त्री रोग, जनरल फिजिशियन सेवा देण्याकरिता सर्वोदय हॉस्पिटल चे सहकार्य लाभले, डोळे तपासणी बिपी शुगर व अन्य सेवा देण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा चे डॉक्टर उपस्थित होते व रक्त तपासणी पंकज पॅथॉलॉजी च्या सहकार्याने करण्यात आले. शिबीर आयोजन करीता ग्रामपंचायत कापसी (खुर्द) चे सरपंच सुरज पाटील, उपसरपंच अक्षय रामटेके, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहनिश तिवारी यांनी परिश्रम घेतले.
तसेच शिबीर ला यशस्वी करण्याकरीता ग्रामविकास अधिकारी संजय सावरकर, सदस्य नारायण दुनेदार, सुभाष सय्याम, सलिम शेख, ममता बांगडे, उषा भोंडेकर, नंदा ढोरे, नेहा पारधी, संध्या पिल्लारे, सोनाली बेंदरे प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा चे आरोग्य सेवक मछींद्र गायकवाड, आरोग्य सेवीका जया मोहड, डॉ. संकल्प कुरुडे, डॉ. डी.जी. ठाकरे, डॉ. दिशा खामनकर, डॉ. दिशा मेश्राम, संजय गहुकर, सर्वोदय हॉस्पिटल नागपुर चे डॉ. जयकिशोर नागपुरे, डॉ. शुभांगी पानकर, पॅथॉलॉजी चे डॉ पंकज नगरधने, सिस्टर करिश्मा वैद्य, कांचन मेश्राम, आशा सेवीका, प्रतिभा बरडे, मिना राऊत, आम्रपाली पाटील, आंगणवाडी सेवीका सुचीता बरडे, उषा बुरडे, मनिषा कापसे, मेघा राऊत, मदतनिस सुलोचना लांडगे, सरीता सारवे ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल राऊत, नागेश कुथे, मनिषा ढोरे, सोमेश्वर दुनेदार यांचे सहकार्य लाभले!