
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडुन टाकल्याच्या घटनेचा संपुर्ण देशभरात सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे, देशातील शेतकऱ्यांवर भाजपाच्या केंद्र सरकार कडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे, भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीला ही लाजवेल असे असून लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यांना सामूहिक रित्या ठार मारल्याची घटना जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडाची आठवण करुन देणारी आहे,
या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी चिमूर तालुका महाविकास आघाडी सरकारने सोमवार दिनांक 11 ऑक्टोम्बर रोजी चिमूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे, चिमूर तालुक्यातील सर्व प्रतिष्ठानें, शाळा, महाविद्यालय, संस्था, दुकानदार यांनी बंदला सहकार्य करण्याचे आव्हान महाविकास आघाडी चिमूर तर्फे करण्यात आले आहे,