Breaking News

प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नव्या सुसज्ज ईमारतीत हलवा – प्रहार सेवक यांची मागणी

प्रहार सेवक विनोद उमरे यांनी आमदार बंटी भागडीया चिमूर निर्वाचन क्षेत्र यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधील सावरी (बिड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारतीचे बांधकाम एक वर्ष पूर्ण झाले असून अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे . प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारत बांधून सुद्धा येथिल कारभार अजूनही जीर्ण ईमारतीत सूरु आहे,

जीर्ण इमारतीत रुग्णांना योग्य ते सोय – सुविधा नसल्याने रुग्णांना अडचन जात आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नव्या इमारतीत हलविण्यात यावे या,अशी मागणी प्रहार सेवक,विनोद उमरे यांनी आमदार बंटी भागडीया यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

चिमूर तालुक्यातील सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ गावांचा समावेश आहे . त्यामुळे येथील रुग्णांना योग्य सोय _ सुविधा मिळत नाही त्या करिता नव्या सुसज्ज इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार हलविण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक यांनी निवेदनातून केली त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक , विनोद उमरे, मुरलीधर रामटेके , सत्यपाल गजभे, स्वप्नील खोब्रागड, स्वप्नील पाटील, प्रशांत शेडमाके, सुभाष भोयर,सुशांत खोब्रागडे, रमेश वाकडे आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

आविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …

कर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान

१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved