
SDPL वसाहत व मंत्री परिवारात शोक
अपघाती मृत्यू की आत्महत्या अनेक प्रश्न अनुत्तरित
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी(प्र.) : वाडी नप क्षेत्रातील गुरुद्वारा समक्ष डॉ.आंबेडकर परिसराला लागून असलेल्या सुसज्ज SDPL वसाहतीत निवास करणाऱ्या मंत्री परिवारातील मुलगा हर्ष मंत्री वय-२० वर्ष याचा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्टेशन च्या पटरीवर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची बातमी धडकताच मंत्री परिवार व स्थानिक निवासीयांना धक्काच पोहचला.
या निवासी संकुलाचे पदाधिकारी अनुराग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री परिवारातील हा मुलगा रविवारी सकाळी घरीच होता.
आदल्या रात्री तो संकुल परिसरात अनेकांशी बोलला देखील.रविवारी सकाळी त्याने आपल्या एका मित्राला नागपूरच्या गणेश टेकडी ला दर्शन करावयाचे असल्याचे सांगून घरून निघाला तसेच सोसायटीच्या प्रवेशद्वारावर तो सीसीटीव्ही कॅमेरात दिसतही आहे. प्रवेशद्वाराबाहेर या अज्ञात मित्राने दुचाकीने त्याला नागपुरात कुठे सोडले हे मात्र गुलदस्त्यात आहे.
परिचितांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी १० च्या सुमारास मृतक हर्ष चंद्रपूर दिशेला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस मध्ये चढला.त्याने तिकीट काढली किंव्हा नाही याची पक्की माहिती नाही.
राजधानी एक्सप्रेस नागपूर हुन सुटून १ तासा नंतर जेंव्हा वेगाने वरोरा रेल्वे स्टेशन जवळ पोहचली त्याच क्षणाला हर्ष या गाडी मधून बाहेर पडला व दरम्यान विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या तामिळनाडू एक्सप्रेस च्या धडकेत सापडला व त्याचा देह छिन्न भिन्न होऊन त्याचे जागीच निधन झाले.ही घटना लक्षात येताच दोन्ही ट्रेन काही वेळ थांबविण्यात आल्या.वरोरा स्टेशन चे अधिकारी व रेल्वे पोलिसांना सूचना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.अस्तव्यस्त मृतदेह एकत्रित करून तो पुढील कार्यवाही साठी पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला.पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या ओळ्खपत्रावरून ओळख पटवून ही माहिती नागपूर रेल्वे पोलिसांना दिली.
पोलिसांनी त्या आधारावर माहिती मिळवीत वाडी ला मृतकाच्या घरी माहिती पोहचविली.मृतकाच्या घरी ही माहिती मिळताच हाहाकार उडाला ,त्याच्या घरी आई,वडील व मोठी बहीण यांना तर विश्वासच बसत नव्हता.घटना समजताच संकुलातील निवासी मोठ्या संख्येने त्यांच्या घरी एकत्रित झाले,या घटनेवरून मंत्री परिवारात व अन्य निवासी नागरिकांत एकच प्रश्न निर्माण झाला की मृतक हर्ष वरोरयत पोहचला कसा? संकुल प्रवेश दवारा समोरील cctv तपासले असता सकाळी ९.५५ ला तो गेट च्या बाहेर निघताना दिसला.तर तिकडे नागपूर रेल्वे स्टेशन हुन राजधानी एक्सप्रेस ही सकाळी १०.१५ ला रवाना होते.
ही बाब लक्षात घेता हर्ष कुणा सोबत व कोणत्या वाहनाने व गतीने रेल्वे स्टेशन वर पोहचला ??? राजधानी एक्सप्रेस शिवाय दुसरी गाडी त्या दिशेला गेली नाही ,त्या मुळे तिकीट न काढता राजधानी मध्ये चढला कसा ?गाडी तुन पडला कसा?असे अनेक संशयास्पद स्थिती व प्रश्न सर्वांना पडले आहे.घरी वा परिसरातही कुणाशीही भांडण वा वाद झाला नाही तेंव्हा हे घडले कसे हा प्रश्नन सर्वांना भेडसावत असून आता पोलिसा समोरच या प्रकरणाचा खरा प्रकार उघडकीस आणण्याचे आवाहण ठरणार आहे.सोमवारी शोकाकुल वातावरणात मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.