
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर कांपा मार्गावर भरधाव येणाऱ्या ट्रकने मालेवाडा जवळ शेळ्यांना चिरडल्याची घटना आज दि २० रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली
अतिवेगवान असणाऱ्या ट्रकने चिमूर कानपा रोडवरील मालेवाडा येथे अकरा शेळ्यांना चिरडले असून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दयाराम जीवतोडे मुक्काम मालेवाडा हे रोड लगत आपल्या शेळ्या चारत होते. कानपा वरून येणारा वेगवान ट्रकने मालेवाडा येथील वळणावर अकरा शेळ्यांना चिडले असून दयाराम जिवतोडे थोडक्यात वाचले आहेत.
एम एच ३४,२४७९ हा ट्रक क्रमांक असून ट्रकचालकाला चिमूर येथील आर टी एम कॉलेज येथे पकडण्यात आले आहे.