Breaking News

दरोडेखोरांच्या क्रूरतेचा कळस दोन महिलांवर सामुहिक बलात्कार

दरोडेखोरांचा धुमाकूळ परीसरात दहशतीचे वातावरण

पैठण :- पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीमध्ये  मंगळवारच्या रात्रो ११ वाजताच्या सुमारास ७ ते ८ दरोडेखोरांनी शेतवस्तीवर हल्ला चढविला. सुरवातीला वस्ती मध्ये असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवित लूटमार करण्यात आली. त्यांना बांधून ठेवत घरातील २३ वर्षीय आणि ३० वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला.तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्रीला दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घटलेल्या घटनेमुळे  पैठण तालुक्यासह संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्या हादरा आहे. या  शेतवस्तीवर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे अवघ्या गावात दहशत पसरली आहे, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढील तपास करीत आहे. यावेळी दोन्ही महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरोडेखोरांची पुरुषांना बेदम मारहाण दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका पीडित महिलेला पाच ते आठ महिन्यांचे लहान बाळ आहे. दरोडेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. पुढील तपास बिडकीन पोलीस आणि ग्रामीण पोलीस करत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved