
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : -चिमूर दिनांक.२०/१०/२०२१ महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती आजच्या दिवशी सर्वत्र वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात येते. वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले वाल्मिक हे ऋषी होते. ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य,कर्तव्य,साह्स यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते.त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली.
त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते.म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.वाल्मिकी ऋषी मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत.
रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे.अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला.स्कंद पुराणानुसार, वाल्मिकी एक जबाबदार पुत्र व नवरा असलेला दुष्काळ पडल्याने चोर/डकैत झाला. असे म्हंटले जाते पुराणात की त्यांनी सात ऋषी (सप्तर्षी) यांना ही लुटायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कडून विविध बोध मिळाले, व यांनी चोरीचा मार्ग सोडून, ऋषी पुलह यांनी दिलेल्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्यांनी इतकी आराधना केली की आजूबाजूला मुंग्यांनी वारूळे बांधलेलीही त्यांना कळली नाहीत. जेव्हा सप्तर्षी परत आले, व त्यांनी हे बघीतले,
तेव्हा त्यांनी यांना वाल्मिकः (म्हणजे मुंग्यांचे वारूळ) मध्ये सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य, म्हणून वाल्मिकी, अशी पदवी दिली.उत्तर कांड/शेष रामायणात ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात सीता शरण घेते, लव-कुशचा जन्मही त्यांच्याच आश्रमात होतो. लव व कुश वाल्मिकींचे पहिले शिष्य मानले जातात व बाल कांड रामायण त्यांना पहिल्यांदा सांगण्यात आले. संपूर्ण रामायण गाथा ही ऋषी वाल्मिकी यांनी श्लोक शैलीत लिहिली. ते आपले पहिले कवी, म्हणून त्यांना आदी कवी, असे ही नमूद केले जाते.
असे म्हंटले जाते की त्यांनी संत-कवी तुलसीदास यांच्या रूपात पुनर्जन्म घेऊन रामचरितमानस, हे अवधी-संस्कृत मध्ये लिहिले.हे जगप्रसिद्ध लेख आहे.आणि म्हणूनच महर्षी वाल्मिकी ऋषि जयंती त्यांची प्रत्येक समाजाप्रती साजरी करण्यात येत असते.अशाच प्रकारे वाल्मिक चौक चिमूर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या फोटो ला माल्यार्पण करून त्यांच्या बद्द्ल चे विचार मांडण्यात आले. काला व महाप्रसाद वाटप करण्यात आले.अशाप्रकारे हि जयंती साजरी करण्यात आली.